शुभंकरोति सचित्र ब्रेल पुस्तके

सचित्र, छापील मराठी ब्रेल शुभंकरोति दिनदर्शिका गेली अकरा वर्षे आम्ही प्रकाशित करीत आहोत. त्या महाराष्ट्रातील अनेक अंध शाळांकडे सप्रेम भेट दिल्या जातात. आता अशाच तर्हेची वेगवेगळ्या विषयांवरील सचित्र, छापील ब्रेल पुस्तके उपलब्ध केली आहेत. पाठ्य पुस्तकांखेरीज इतर विषयांवर माहिती ह्या पुसतकांचे वैशिष्ठ्य आहे.

 अनेक विषयांवर सुटसुटीतपणे, थोडक्यात माहिती

ही नवीन सचित्र ब्रेल पुस्तके वेगवेगळ्या विषयांवर लिहिली आहेत. त्यांची थोडक्यात पण उपयुक्त माहिती सुटसुटीतपणे लिहिली आहे. हे सारे छोट्या आकाराच्या आणि कमी पानांत छापली आहे. म्हणूनच अशी पुस्तके आवडीने वाचली जातात.

 कधीच न बघितलेली रेखाचित्रे

ह्या पुस्तकांत अगदी सोपी रेखाचित्रे छापली आहेत. पूर्वी कधीच न बघितलेली रेखाचित्रे तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकाल.

 टिकाऊ पुस्तके

ह्यातील ब्रेल मजकूर किंवा फुगीर रेखाचित्रे पुसली जात नाहीत. म्हणूनच ही छापील, सचित्र मराठी ब्रेल पुस्तके टिकाऊ आहेत.

ही सचित्र, छापील ब्रेल पुस्तकांची संकल्पना डॉ. जयंत चिपळूणकर यांची आहे.

पुढे वाचा