शुभंकरोति ब्रेल

सचित्र, छापील मराठी ब्रेल शुभंकरोति दिनदर्शिका गेली अकरा वर्षे आम्ही प्रकाशित करीत आहोत. त्या महाराष्ट्रातील अनेक अंध शाळांकडे सप्रेम भेट दिल्या जातात.


शुभंकरोति दिनदर्शिकेची दहा बर्ष

आता अशाच तर्हेची वेगवेगळ्या विषयांवरील सचित्र, छापील ब्रेल पुस्तके उपलब्ध केली आहेत. पाठ्य पुस्तकांखेरीज इतर विषयांवर माहिती ह्या पुस्तकांचे वैशिष्ठ्य आहे. शुभंकरोति दिनदर्शिकांप्रमाणेच ही सचित्र ब्रेल पुस्तकेही टिकाऊ आहेत. ह्या पुस्तकांत अगदी सोपी, उठावदार रेखाचित्रे छापली आहेत. पूर्वी कधीच न बघितलेली ही रेखाचित्रे तुम्ही नक्कीच समजूल घेऊ शकाल.

सर्वसाधारणपणे ब्रेल लिपीतील मजकूरास मोठी जागा लागते. त्यासाठी पानांचा आकार मोठा वापरावा लागतो. शिवाय पानेही खूप लागतात. बर्याच वेळा अशी पुस्तके कमी वाचली जाऊ शकतात. ह्याउलट शुभंकरोति सचित्र ब्रेल पुसतके सुटसुटीत वाटतात. ह्या पुस्तकांत प्रत्येक विषयावर थोडक्यात माहिती आणि साधी फुगीर रेखाचित्रे छापली आहेत. पानांची कमी संख्या आणि छोटा आकार असल्यामुळे ही पुस्तके आवडीने वाचली जातात. ह्यातील ब्रेल मजकूर आणि फुगीर रेखाचित्रे पुसली जात नाहीत. म्हणूनच ही छापील मराठी ब्रेल पुस्तके टिकाऊ आहेत.


सचित्र पुस्तकांचे नमुने