संदेश

(११-७-२०१६): आपल्या संकल्पनेवर आधारित शुभंकरोति दिनदर्शिका २०१६-१७ प्राप्त झाली. नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही सचित्र दिनदर्शिका निश्चितच उपयुक्त आहे व आमच्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. असेच नाविण्यपूर्ण प्रयोग यापुढेही आपण कराल अशी खात्री आहे. लोभ आहेच, वृद्धींगत व्हावा ही विनंती.

द न्यू मॉडेल लिटररी अॅंड इंडस्ट्रियल एज्यूकेशन सोसायटी, नागपूर

(१९-६-२०१४): शुभंकरोति दिनदर्शिका सन २०१४-१५ ची प्रत मिळाली त्याबद्दल धन्यवाद. रोजच्या दिवसाची सुरवात आपल्या ब्रेल दिनदर्शिकेने होते.
आपण अंध मुलांसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण विषय घेऊन नवीन ब्रेल पुस्तके तयार केल्यामुळे मुलांचे स्पर्शज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे आम्हास वाटते. याची यादी व मूल्य पाठवल्यास आम्हाला ती घेता येतील. आणि त्या बहुमूल्य पुस्तकांमुळे आमच्या शाळेतील अंध मुलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
ब्रेल शुभंकरोति दिनदर्शिका देऊन उपकृत केल्याबद्दल सतशः आभार…
असेच आपले समाज कार्य वृद्धींगत होवो हीच आमच्या अंधशाळेतर्फे सदिच्छा व महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना.

(१-७-२०१३): शुभंकरोति दिनदर्शिेका सन २०१३-२०१४ च्या प्रती मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद. रोजच्या दिवसाची सुरवात आपल्या ब्रेल दिनदर्शिकेने होते.
तसेच मराठी लेखक कै. चिं. वी. जोशी यांचे रेखाचित्र समाविष्ट असलेले आणि त्या बहुमूल्य विनोदी गोष्टीमुळे आमच्या शाळेतील अंधमुलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. …… ही माहिती मुलांना खूप आवडली आणि अंध मुलांना त्याचा भरपूर उपयोग होणार आहे. ……

(१३-७-२०१२): आपण आमच्या अंधशाळेसाठी शुभंकरोति दिनदर्शिका गेली सहा वर्षे पाठवत आला आहात त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद. याही वर्षी सन २०१२-२०१३ ची शुभंकरोति दिनदर्शिेका पाठविल्याबद्दल धन्यवाद. तसेच या दिनदर्शिकेमध्ये गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांची माहिती दिल्यामुळे मुलांना त्याचा नक्कीच लाभ मिळत आहे. असेच आपले कार्य जोमाने चालू रहावा हीच अंधशाळा परिवारातर्फे आपणास शुभेच्छा.

(६-८-२०१०): आपण शुभंकरोति दिनदर्शिका २०१०-११ ची प्रत आम्हाला मिळाली आहे. आपण गेली पाच वर्षे ही दिनदर्शिका आम्हास पाठवित आहात. त्याबद्दल धन्यवाद. तसेच प्रत्येक वर्षी नवनवीन माहिती आमच्या मुलांना ह्या दिनदर्शिकेद्वारे आपण देत आला आहात. या वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये नोबेल पारितोषिकाच्या पदकाचे रेखाचित्र काढले आहे व नोबेल पारितोषिक मिळविलेल्या भारतीयांची ओळख लिहिल्यामुळे मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडत आहे. तसेच आपण अशा प्रकारची ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहात. त्याबद्दल आपणांस शुभेच्छा. असेच आपणकडून सामाजिक कार्य घडत राहो हीच आमच्या अंधशाळा परिवरातर्फे शुभेच्छा.

(२-4-२००८): आपले गुढी पाडव्याचे ब्रेल शुभेच्छापत्र मिळाले. धन्यवाद. तसेच आपणासही नवीन वर्ष गुढापाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणास हे वर्ष आनंदाचे भरभराटीचे आरोग्यदायी जावो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. कळावे.

(२-१०-२००७): I am in receipt of two copies of “Shubham Karoti” Calendar and deeply overwhelmed by it. The lettering, characters and right placement of it impressed me very much. The marvelous portrait of “Louis Braille” has been experienced by the students with touch. I feel that this type of project will naturally overcome the shortcomings experience in embossed Braille Script and definitely will cross the limitations.

I am very much thankful to you for introducing such a nice type of art for these students through your Honour and wish grand success to it.

ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध शाळा, कोल्हापूर

(२२-७-२०१६): आपण पाठविलेली मराठी ब्रेल लिपीतील शुभंकरोति दिनदर्शिका २०१६ मिळाली. दिनदर्शिका सचित्र व माहितीपूर्ण आहे. तसेच आपण शुभंकरोति दिनदर्शिकेत छापलेले रेखाचित्र मुले हाताळताना त्यांना चित्र बघण्याचा आनंद घेता येतो. तसेच त्यातील रेखाचित्र, माहिती वाचून व व्यंगचित्र हाताळून मुलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडण्यास मदत होईल.

(५-७-२०१४): आपण पाठविलेली मराठी ब्रेल लिपीतील शुभंकरोति दिनदर्शिका आम्हास मिळाली असून दिनदर्शिकेतील दिलेली माहिती खूप समर्पक व उद्बोधक आहे. तसेच प्रथम दर्शनी जे उठावदार चित्र दिले आहे त्यातून चित्र बघण्यातला अनुभव मुलांचे कुतुहल वाढवीत आहे. तसेच दिलेली माहिती सोप्या व सुटसुटीत भाषेत असल्याने मुले वाचनाचा आनंद घेत आहेत. ……

(६-९-२०१०): …… या दिनदर्शिकेद्वारे आपण दृष्टीहीन मुलांसाठी जसे ब्रेल लिपी वाचता येते त्याच प्रमाणे बोटांच्या स्पर्शानेही फुगीर चित्रेपण ओळखता येतात याची अनुभूती आपणांकडून आम्हास मिळाली.
तसेच दिनदर्शिकेद्वारे आपण दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात पण महत्वाची माहिती पुरविण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आम्हास आवडला. ……

कै. सौ. सुशिलाबाई घोडावत निवासी अंधशाळा, मिरज

(२८-१-२०१०): आपणाकडून शुभंकरोति दिनदर्शिका २००९-१० तसेच यासोबत पाठविलेले Tactile-Braille Periodic Table of Elements हे दोन्ही मिळाले. दोन्ही पुस्तिका आमच्या अंधशाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना खूप आवडल्या.

शुभंकरोति दिनदर्शिका २००९-१० हा अंक तर खूपच आवडला. त्यायोगे विद्यार्थ्यांना वार, दिनांक, महिने व महत्त्वाचे सण स्वतः वाचून समजू लागले. त्यातील महाराष्ट्र नकाशा, व भारताचा नकाशा हे पाहून विद्यार्थ्यांना नकाशा वाचनाचे आवड निर्माण झाली. तसेच या दिनदर्शिकेसोबत पाठविलेले Tactile-Braille Periodic Table of Elements ही पुस्तिकाही विद्यार्थ्यांना खूप आवडली. विशेषतः रसायनशास्त्राविषयी व त्यामधील मूलद्रव्यांविषयी जी माहिती किचकट वाटत होती ती या पुस्तिकेमुळे कुतूहलजनक व अभिरूचीपूर्ण, अभ्यासयुक्त वाटू लागले. पुस्तिका पाठविल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन काही असल्यास पाठवीत जाणे. कळावे,

(५-८-२००८): आपण नेहमी पाठवित असलेल्या दिनदर्शिकेच्या तिसऱ्या वर्षाबद्दल प्रथम शभेच्छा. दिनदर्शिका वाचून मुलांना खूप आनंद झाला. यांचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी आपले सहकार्य व मानस विद्यार्थांपर्यंत पोहोचण्याची पावती आपणास पाठवित आहे.

अंध विकास संस्था संचलित अंधशाळा, पंढरपूर

(२३-७-२०१३): …… दृष्टिबाधितार्थ विद्यार्थ्यांना वर्षभरातील सण, वार, विशेष दिन याची माहिती ब्रेल लिपीत सहज उपलब्ध व्हावी या दृष्टीने आपण राबवित असलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.

दिनदर्शिकेमध्ये फुगीर रेखाचित्राच्या माध्यमातून काढलेल्य मराठी विनोदी लेखक चिं. वी. जोशी यांचे रेखाचित्राद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्तीविशेष आणि त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख, त्यांच्या विनोदी गोष्टीबद्दलची माहिती करून देणे सुलभ होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने आपण करीत असलेले कार्य आम्हास प्रेरणादायी असे आहे.

राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्याईंड, सोलापूर

(५-८-२०१०): …… मराठी ब्रेल लिपीत छापलेल्या शुभंकरोति दिनदर्शिका २०१०-११ च्या माध्यमातून सर्व नेत्रहीन विद्यार्थ्यांना वार, दिनांक, सण विशेष दिनांच्या तारखा जाड चौकटीत लिहिल्यामुळे ते सहजगत्या विद्यार्थ्यांना समजते. दिनदर्शिकेच्या पहिल्या पानावर नोबेल पारितोषिकाच्या पदकाचे रेखाचित्र तसेच बोटांच्या स्पर्शाने दिनदर्शिकेत दाखविलेली फुगीर चित्रे ही सहजतेने ओळखता येते. यामुळे नोबेल पारितोषिक मिळविलेल्या भारतीयांचीही विद्यार्थ्यांना माहिती होवून त्यांच्यात ब्रेल लिपी वाचण्याची आवड निर्माण होवून त्यांचे सामान्यज्ञान वाढते. ……

डॉ. नरेन्द्र भिवापूरकर अंध विद्यालय, अमरावती

(१७-८-२०१०): …… शुभंकरोति दिनदर्शिका ही अंध मुलांसाठी अत्यंत फायद्याची आहे. तसेच या दिनदर्शिकेमऴे अंध मुलांना ब्रेल लिपी वाचण्याची व वेगवेगळ्या रूपाने विविध प्रकारची माहिती मिळते. महिन्यातील वार, रविवार आणि सण-विशेष दिनांच्या तारखा, जाड चौकटीत लिहिल्या आहेत त्यामुळे अंध मुलांना महिन्याची संपूर्ण माहिती मिळते. ……
…… अशा प्रकारे तुम्ही पाठविलेल्या दिनदर्शिकेमुळे नोबेल पारितोषिक मिळविलेल्या भारतियांची व महिन्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ……

अंध विद्या मंदिर, वर्धमनेरी, वर्धा

(३१-३-२०१०): …… Karen liked the layout and organization and says, “I think he did a marvelous job capturing the atomic number, atomic symbol, and atomic weight within 8 braille pages. Very nicely organized, and I like the way he had the lanthanoids contained on one page, and another page dedicated to the actinoids.” ……

Roberta Williams, American Printing House, Kentuky, USA

(२५-७-२००८): शुभंकरोति दिनदर्शिका २००८-२००९ दोन प्रती मिळाल्या. खूपच आवडल्या. कमी दृष्टी असणाऱ्यांसाठी व डोळसांसाठी सुद्धा या सर्वांचा विचार करून सदर दिनदर्शिका आपण तयार केली. ब्रेल लिपीतील लेखन व इतर माहिती सर्वांनाच मनापासून आवडली.

आदरणीय साधनाताई आमटे यांनीही आपल्या शुभंकरोति दिनदर्शिकेचे स्वागत केले आहे. आगामी क्रीडा स्पर्धेचे सविस्तर वर्णन व क्रीडा प्रकारांचे चिन्ह सुद्धा सर्वांना माहिती झाले.

आपण या अगोदर पाठविलेले ब्रेल लिपीतली फुगीर अक्षरे व चित्र काढलेले ग्रीटिंग सुद्धा उत्तम होते. अशा तऱ्हेची ब्रेल लिपीतील छापील पुस्तकेही छापण्याबाबतची आपली कल्पना प्रशंसनीय आहे. आपल्या सदैव सहकार्याबद्दल धन्यवाद.

आनंद अंध विद्यालय, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर

(२१-७-२००८): ऑक्टोबर मध्ये तिसऱ्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेनिमित्त तयार केलेली दिनदर्शिका मिळाली. प्रत्येक महिन्यातील वार, रविवार आणि सण-विशेष दिनांच्या तारखा जाणून घेण्यात अंध मुलांना नक्कीच फायदा होईल…

द ब्लाईंड बॉइज इंस्टिट्यूट, नागपूर

(१-१०-२००७): आपण आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतीलच परंतू एक नाविन्यपूर्ण असे शुभंकरोति दिनदर्शिका पाठविल्या आहेत त्याबद्दल प्रथम आपले विनम्र आभार तसेच धन्यवाद.

आपण ब्रेल अक्षरे एंबॉस न करता ती फुगीर परंतु स्वच्छ, स्पष्ट तसेच उठावदारपणे छापली आहेत. त्याचबरोबर ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचे चित्रही आपण अत्यंत उत्तम प्रकारे उठावदार पद्धतीने छापले आहे. हे एक अत्यंत महत्वाचे असे अंध साहित्यातील आवश्यक असे पाऊल आहे. त्याबद्दल पुनश्च एकवेळ आभार व अभिनंदनही करावेसे वाटते. त्याचप्रमाणे आपला याच प्रकारे जो ब्रेल पाठ्यपुस्तक निर्मितीचा मनोदय ठेवलेला आहे तो आपण याचप्रमाणे प्रत्यक्षात आणलात तर सर्व अंध विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा मैलाचा दगड ठरेल कारण त्यामुळे काही आकृत्या व चित्रे अंध विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांएव्हड्याच ताकदीने समजतील. तो आपण प्रत्यक्षात उतरवल्यास आमच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आपल्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्था, कोरेगाव

तुमची पुस्तके मिळाली. खूपच आवडली. नेहमीची पुस्तके खूप मोठी असतात. ही छोटी पुस्तके अगदी बरोबर पटकन नेता येतात. आणखी पुस्तके केली तर कळवा.

राधा बोरडे, नागपूर

दिनदर्शिका खूप आवडली. सर्वांना खूप उपयोग होतो.

हिंगोलीमधून फोनवरील निरोप

इतर दिनदर्शिका मिळतात, पण तुमच्या दिमदर्शिका आणखीन उपयुक्त वाटतात.

श्री. हरीहर पद्माकर पाटील, जलगावजळगाव

The books on animals and drawings of our national symbols give a great insight about how 2-D figures are drawn and about their structure. I enjoyed reading the books with wonderful drawing…. The Sangeet Mala series is really innovative. It was exciting to read the Braille music notations… It’s always a pleasure to read the Shubham Karoti calendar since it has an interesting theme…

डॉ. दिव्या बिजूर